दोंडाईचा (संतोष कोळी) – शहादा तालुक्यातील जूने बामखेडा येथे 15 ऑगस्ट 2020 रोजी बामखेडा.येथील अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाज संघटनेचे शहादा तालुका अध्यक्ष किरणभाऊ सोनवणे यांनी वृक्ष देऊन समाजाच्या तरूण पिढी नेतृत्व म्हणून या झाडे लावा देश वाचवा असे म्हणी प्रमाणे
वृक्षारोपण 15 ऑगस्ट या स्वतंत्र दिनाच्या औचित्यसाधून बामखे डा त.येथील कोळी समाजाचा युवकांनी पुढाकार घेऊन जूने बामखेडा येथे वृक्षारोपण करण्यात आले. शहादा तालुक्यातील बामखेडा त.त.हे गाव पुनर्वसन झालेले असून पूर्वी हे गाव तापी नदीच्या तीरावर वसलेले गाव होते.या जूने बामखेडा हे गाव तापी नदीच्या तीरावर असलेले गाव होते.या गावात पूर्वीपासून कोळी समाजाचे सोनवणे कुळाचे कुलदैवत म्हणून मनुदेवी मानली जाते.या कोळी समाजाचा सोनवणे कुळाचे कुलदैवत माता मनुदेविचे मंदिरं आहे येथे मातेचे भक्त नवस फेडण्यासाठी येत असतात म्हणून रिकाम्या जागेवर व या ठिकाणी अस्तित्वात आहे.ही मनु देवीचे मंदिर पंचक्रोशीत व परिसरात प्रसिद्ध आहे. हे म्हणून मनु देवी माता मंदिर कोळी समाजातील सोनवणे कुळाचे श्रद्धास्थान म्हणून देखील ओळखले जाते.या मनु देवीच्या मंदिरावर दरवर्षी रामनवमीच्या दिवशी नवस फेडण्यासाठी आणि जाऊल उतरविण्यासाठी या मनु देवीच्या मंदिरात परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने व भावनेने या ठिकाणी येत असतात.या ठिकाणी दरवर्षी पंचक्रोशीतील व परिसरातील कोळी समाजाचे सोनवणे कुळाचे श्रद्धास्थान असल्याने भाविक मोठ्या भावनेने या ठिकाणी येत असतात.या मनु देवी माता मंदिराच्या 201 बाय 201जागेच्या परिसरात कोळी समाजाचा युवकांनी वृक्षारोपण केले. यात आंबा चिंच सीताफळ कर्दम अशोक वृक्ष सिसम गुलमोहर पिंपळ, बेल, उंबर आदी वृक्षांचे लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाच्या वेळी गावातील युवक संजय सोनवणे, आनंदा सोनवणे, संजय एस सोनवणे, राकेश कुवर, गुलाब सोनवणे महेंद्र सोनवणे, मनोज सोनवणे, राजेंद्र सोनवणे, मुकेश सोनवणे, निलेश सोनवणे ,राजधर सोनवणे, योगेश सोनवणे ,राजकुमार सोनवणे, सागर सोनवणे,आदी उपस्थित होते.







