जिल्ह्यातील उमेदवारांनी केले सहकुटुंब मतदान

मतदान

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु असून, जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४०.६७ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत आपले नशीब आजमाविणाऱ्या सर्व उमेदवारांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच मतदान केल्यानंतर बाहेर पत्रकारांतर्फे नागरिकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

 

मुक्ताईनगर येथे सहपरिवार आ. चंद्रकांत पाटील व ॲड. रोहिणी खडसे यांच्यासह माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी मतदान केले. रावेर येथे आ. शिरीष चौधरी यांचेसह सहपरिवार उमेदवार धनंजय चौधरी, अमोल जावळे, भुसावळ येथे आ. संजय सावकारे, डॉ. मानवतकर यांनी मतदान पूर्ण केले.

 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे मतदानाचा हक्क बजावला. तर मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर शहरात परिवारासह मतदान केले. अमळनेर येथे मंत्री अनिल पाटील यांनी, पारोळा येथे उमेदवार अमोल चिमणराव पाटील, डॉ. सतीश पाटील, चाळीसगावात आ. मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक, उन्मेष पाटील, पाचोरा येथे आ. किशोर पाटील, वैशाली सूर्यवंशी, जळगाव शहरात आ. राजूमामा भोळे, जयश्री महाजन, जळगाव ग्रामीण येथे माजी मंत्री गुलाबराव देवकर, दिलीप खोडपे यांनी जामनेर तालुक्यातील नेरी येथे मतदान केले. उमेदवारांनी सर्व नागरिकांना लोकशाहीच्या या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करीत मतदान करा असे सांगितले आहे.

दरम्यान राज्यभरातील दुपारी ३ वाजेपर्यंतची जिल्हानिहाय मतदान टक्केवारी
अहमदनगर – ४७.८५ टक्के
अकोला – ४४.४५ टक्के
अमरावती -४५.१३ टक्के
औरंगाबाद- ४७.०५टक्के
बीड – ४६.१५ टक्के
भंडारा- ५१.३२ टक्के
बुलढाणा-४७.४८ टक्के
चंद्रपूर- ४९.८७ टक्के
धुळे – ४७.६२ टक्के
गडचिरोली-६२.९९ टक्के
गोंदिया -५३.८८ टक्के
हिंगोली – ४९.६४टक्के
जळगाव – ४०.६२ टक्के
जालना- ५०.१४ टक्के
कोल्हापूर- ५४.०६ टक्के
लातूर _ ४८.३४ टक्के
मुंबई शहर- ३९.३४ टक्के
मुंबई उपनगर-४०.८९ टक्के
नागपूर – ४४.४५ टक्के
नांदेड – ४२.८७ टक्के
नंदुरबार- ५१.१६ टक्के
नाशिक -४६.८६ टक्के
उस्मानाबाद- ४५.८१ टक्के
पालघर- ४६.८२ टक्के
परभणी- ४८.८४ टक्के
पुणे – ४१.७० टक्के
रायगड – ४८.१३ टक्के
रत्नागिरी- ५०.०४टक्के
सांगली – ४८.३९ टक्के
सातारा – ४९.८२टक्के
सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के
सोलापूर -४३.४९ टक्के
ठाणे – ३८.९४ टक्के
वर्धा – ४९.६८ टक्के
वाशिम -४३.६७ टक्के
यवतमाळ – ४८.८१ टक्के

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here