शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी लि., शिर्डी मार्फत संस्थेचे सभासद तसेच कर्मचाऱ्यांची दि. न्यु इंडिया इंन्शुरन्स कंपनीकडुन अपघात विमा पॉलीसी घेण्यात आलेली असुन संस्थेचे सभासद कै. भाऊसाहेव निवृत्ती औताडे यांचे अपघाती निधन झाल्याने विमा कंपनीकडुन मंजुर विमा क्लेम रक्कम रु. २०,००,०००/- चा धनादेश संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार पा. यांचे हस्ते कै. भाऊसाहेब निवृत्ती औताडे त्यांच्या पत्नी श्रीमती मनिषा भाऊसाहेब औताडे यांना सुपुर्त करण्यात आला.
सदर प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन पोपट भास्कर कोते पा., संचालक महादु बापु कांदळकर, कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा., संभाजी शिवाजी तुरकणे पा., देविदास विश्वनाथ जगताप, विनोद गोवर्धन कोते पा., मिलींद यशवंत दुनबळे, तुळशीराम रावसाहेब पवार पा., रविंद्र बाबु गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा., इकबाल फकिरमहंमद तांबोळी, गणेश अशोक आहिरे, रंभाजी काशिनाथ गागरे, संचालीका सुनंदा किसन जगताप पा.,लता मधुकर बारसे पा., सह. सचिव विलास गोरखनाथ वाणी पा. तसेच विमा प्रतीनिधी श्री धनंजय आठरे उपस्थित होते.







