नाशिकमध्ये पंचवटी भागात किरकोळ भांडणावरून युवकाचा धारदार शस्त्राने निघृण खून

निर्घृण हत्या
File Photo

नाशिक (प्रतिनिधी कुबेर जाधव) : लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून पंचवटी परिसरात रविवारी एका युवकाचा धारदार शस्त्राने निघृण खून करण्यात आला. या खुनातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या खूनप्रकरणात दोन महिलांचा देखील समावेश असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहे.

या घटनेची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी दिली आहे. विशांत राजाराम भोये (वय २४, रा. बिडी कामगार नगर, स्वामी समर्थ केंद्राजवळ) याने लहान मुलांच्या झालेल्या भांडणावरून एका मुलाला मारले होते. याचाच राग डोक्यात ठेवून टोळक्याने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. संशयित टोळक्याने रविवार ४ रोजी रात्रीच्या सुमारास विशांत भोये याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विशांतच्या अंगावर धारदार चाकूने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना ताब्यात घेतले. तर इतर फरार झालेल्या संशयितांच्या मागावर पोलीस पथके पाठवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here