अल्पवयीन मुलीवर केला पित्यानेच लैंगिक अत्याचार

बलात्कार
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : जन्मदाता पिताच आपल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर जवळपास वर्षभर लैंगिक अत्याचार करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पिडीत १७ वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ३७ वर्षाच्या वडिलांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर २०२३ ते २३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान सुरु होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही तिच्या वडिलांनी फिर्यादीला हाताने मारहाण करुन बळजबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. घरात कोणालाही काहीही सांगायचे नाही, नाही तर तुम्हाला सर्वांना रस्त्यावर आणीन, अशी धमकी दिली. फिर्यादीशी वारंवार शरीरसंबंध ठेवून तिला शारीरीक व मानसिक त्रास दिला. ही बाब तिच्या आईला माहिती झाली.

त्यानंतर तिची आई जेथे घरकाम करते, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आई मुलीला घेऊन पोलिसांकडे आली. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here