मुकूंदनगरमध्ये अडीच लाखांची घरफोडी

crime
file photo

पुणे (क्राइम रिपोर्टर प्रशांत महाजन) : शहरातील मुकूंदनगर परिसरात बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी दोन लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना देखील समोर आली आहे.

याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात २८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. तक्रारदार हे मुकूंदनगर येथील चाफेकर रोडवरील केदार रेसेडन्सी या इमारतीत राहण्यास आहेत. ते २० नोव्हेंबर रोजी कुटूंबियासह घराला कुलूप लावून गेले होते. तेव्हा चोरट्यांनी कुलूप उचकटून घरातील अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला. तक्रारदार हे शनिवारी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here