लोकलमध्ये सीटवरून वाद; अल्पवयीन मुलाने केला चाकू हल्ला

crime
File Photo

ठाणे (जिल्हा प्रतिनिधी प्रकाश कदम) : लोकल प्रवासात सीटवरुन महिलांमध्ये भांडणं आपण नेहमीच पाहत असतो. पण लोकलमध्ये सीटच्या वादातून एका अल्पवयीन तरुणाने ३५ वर्षीय प्रवाशाला चाकूने वार करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. ही घटना घाटकोपर रेल्वे स्थानकातील आहे.

कुर्ला जीआरपीने दिलेल्या माहितीनुसार, अंकुश भालेराव असे मृताचे नाव आहे. घटनेशी संबंधित पुरावे नष्ट केल्याच्या आरोपावरून कुर्ला जीआरपीने भालेराव आणि त्याच्या मोठ्या भावाची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

अल्पवयीन मुलाला डोंगरी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. आरोपीचा भाऊ मोहम्मद सनाउल्ला शेख उर्फ ​​सोहेल याला स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.कुर्ला जीआरपीनुसार अंकुश भालेराव १४ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता टिटवाळ्याहून घाटकोपरला जाण्यासाठी फास्ट लोकल पकडत होते. यावेळी त्यांचा एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलासोबत सीटवर बसण्यावरून वाद झाला.

दरम्यान, अंकुश आणि त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या अन्य दोन प्रवाशांनी या अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. दुसऱ्या दिवशी घाटकोपर स्थानकाच्या फलाटावर अज्ञातांनी अंकुशवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला, त्यानंतर अंकुशला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उपचारादरम्यान अंकुशचा मृत्यू झाला.

एसटीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, गुन्हे शाखेचे रोहित सावंत, कुर्ला जीआरपीचे वरिष्ठ पीआय संभाजी यादव, पीआय प्रशांत सावंत यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोहम्मद सन्नाउल्ला उर्फ ​​सोहेल याला गोवंडी येथून अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here