गुरुकुलम ग्लोबल स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात संपन्न

ग्लोबल स्कूल

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : गुरुकुलम ग्लोबल स्कूलमध्ये संविधान दिनाचा ७५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना संविधान सभा सदस्यांच्या हस्ताक्षरांनी युक्त भारतीय संविधानाची मूळ फोटो लिथोग्राफ प्रत पाहण्याची संधीही देण्यात आली.

 

विद्यार्थ्यांना संविधान, मुलभूत हक्क व कर्तव्य यांची जाणीव लहान वयातच व्हावी यासाठी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खान्देशात प्रथमच एका विद्यालयात भारतीय संविधानाची मूळ फोटो लिथोग्राफ केलेली प्रत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे, ही विशेष बाब ठरली आहे.

 

या उपक्रमासाठी १५० वर्षांची परंपरा असलेल्या व.वा. वाचनालयाचे सहकार्य लाभले होते. यासाठी कार्याध्यक्ष अनिल शहा व ग्रंथपाल अनिल अत्रे यांचे मोलाचे योगदान होते.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.वृषाली पाटील व प्रशासकीय प्रमुख ललित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वी झाला. शाळेचे अध्यक्ष संकेत पाटील व सौ.तेजश्री संकेत पाटील यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here