लाचप्रकरणी हवालदारासह दोघांना अटक; वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वैराग पोलीस स्टेशन

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. तसेट लाचखोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. आता सोलापूरमध्ये असेच लाचखोरीचे प्रमाण समोर आले आहे. अपघाताच्या घटनास्थळातील पंचनाम्याचे कागदपत्रे देण्यासाठी २० हजारांची लाच मागण्यात आली. तसेच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी हवालदारासह दोघांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी करण्यात आली.

 

या प्रकरणी हवालदार राहुल इरण्णा सोनकांबळे (वय ५२ वर्षे), मनोज किशोर वाघमारे (४० रा. सिद्धार्थ नगर वैराग, बार्शी) या दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. तक्रारदाराचे वडील रस्ते अपघातामध्ये जखमी झाले होते. या प्रकरणी ११ ऑक्टोबरला वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

 

गुन्ह्याचा तपास हवालदार राहुल सोनकांबळे यांच्याकडे होता. इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी घटनास्थळ पंचनाम्याची कागदपत्रे तक्रारदाराला हवे होते. हवालदार सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी २० हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीने ही रक्कम १५ हजार रुपये देण्याचे ठरले. खासगी व्यक्ती मनोज वाघमारे याच्यामार्फत सोनकांबळे यांनी स्वतः करिता रक्कम स्वीकारली. दोघांनाही ॲन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई ॲन्टी करप्शनचे पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार, हवालदार श्रीराम घुगे, प्रमोद पकाले, शिपाई राजू पवार, चालक राहुल गायकवाड यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here