मऊगंज (मध्यप्रदेश) : जिल्ह्यात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. लोकांना आपत्कालीन वेळेत मदत करणाऱ्या रुग्णवाहिकेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची झाल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशात २२ नोव्हेंबर रोजी रुग्णवाहिकेच्या चालकासहित चार जणांनी अल्पवयीवर मुलीवर अत्याचार केला. या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या गैरकृत्यात पीडित मुलीची बहीण आणि तिच्या दाजीचाही समावेश असल्याची माहिती हाती आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी तिची बहीण आणि तिच्या दाजीसोबत रुग्णवाहिकेतून जात होती. त्यांच्यासोबत कोणताही रुग्ण नव्हता. रुग्णवाहिकेत तिघांव्यतिरिक्त चालक आणि त्याचा सहकारी होता. अल्पवयीन मुलगी रुग्णवाहिकेच्या चालकाला ओळखत होती. रस्त्यात मुलीची बहीण आणि तिचा दाजी पाणी आणण्यासाठी रुग्णवाहिकेच्या बाहेर उतरला. याचदरम्यान, चालकाने रुग्णवाहिका सुरु करून वेगाने पुढे नेली. त्यानंतर धावत्या रुग्णवाहिकेत आळी पाळीने दोघांनी अत्याचार केला. अल्पयवीन मुलीने बहीण आणि तिच्या दाजीवरही आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी पुढे सांगितलं की, ‘अल्पवयीन मुलीला संपूर्ण रात्र बांधून ठेवलं. त्यानंतर सकाळी एका रस्त्याजवळ फेकलं. आयपीएस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पीडित मुलीने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला. कुटुंबाची बदनामी आणि भीतीमुळे मुलीने हा प्रकार पोलिसांना सांगितला नाही. दोन दिवसांनी पीडित मुलगी आणि तिच्या आईने पोलिसांना कळवलं. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीवरून चार जणांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी रुग्णावाहिका चालक वीरेंद्र आणि सहकारी केवटला बुधवारी अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलीची बहीण आणि दाजी फरार आहे. आयपीएस अधिकाऱ्यांनी म्हटलं की,पोलीस मुलीची बहीण आणि दाजीच्या शोधावर आहेत. सर्व आरोपींवर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.







