अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला १४१ वर्षांचा तुरुंगवास

arrest
file photo

मल्लपुरम (केरळ) : अल्पवयीन मुलांवरील अनैतिक कृत्ये आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वेगळा पोक्सो कायदा आणण्यात आलाय. अशा अनेक प्रकरणांमध्ये आपली जवळची माणसं गुंतलेली असतात. अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या सावत्र पित्याला न्यायालयाने १४१ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

 

मलप्‍पुरम जिल्ह्यातील मांजेरी शहरातील फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अश्रफ एएम यांनी आरोपीला लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण (पोक्सो) कायदा, भारतीय दंड संहिता आणि बाल न्याय कायदा यातील विविध तरतुदींनुसार एकूण १४१ वर्षांची शिक्षा सुनावलीये.

 

न्यायालयाच्या २९ नोव्हेंबरच्या आदेशानुसार, दोषीला एकूण ४० वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे. कारण ही त्याला सुनावण्यात आलेली सर्वोच्च शिक्षा आहे. यामध्ये म्हटलं की, वेगवेगळ्या तरतुदींनुसार दिलेल्या वेगवेगळ्या शिक्षा एकत्र चालतील. न्यायालयाने दोषीला ७.८५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आणि पीडितेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here