पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : लाडकी बहीण योजनेतील पैशांचे वाटप सुरू असल्याची बतावणी करून चोरट्याने ज्येष्ठ महिलेकडील ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. गुरुवारी सकाळी ११च्या सुमारास हडपसर भागात हा प्रकार घडला. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला हडपसर भागात राहायला आहेत.
गुरुवारी त्या सकाळी ११च्या सुमारास हडपसर भागातून निघाल्या होत्या. त्यावेळी एका चोरट्याने त्यांना अडवले. आमचे साहेब लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप करत आहेत असे सांगितले.
चोरट्याने त्यांना बोलण्यात गुंतविले आणि मंगळसूत्र आणि अंगठी काढून ठेवण्यास सांगितले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने दागिने चोरले. त्यानंतर चोरटा पसार झाला. या प्रकरणी हडपसर पोलीस अधिक तपास करत आहेत.
ले. आमचे साहेब लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे वाटप करत आहेत असे सांगितले.