महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ स्पेशल लोकल धावणार

mumbai-local
file photo

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेनं ५ आणि ६ डिसेंबर दरम्यान परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल या स्टेशनातंर्गत १२ स्पेशल लोकलच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पेशल लोकल सर्व स्थानकावर थांबतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी दिली.

 

“देशभरातून येणारे अनुयायी लक्षात घेता मध्य रेल्वेनं विविध सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधांमुळं प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना गर्दीचा सामना देखील करावा लागणार नाही. तसंच सर्व प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा,” असं आवाहन देखील डॉ. स्वप्निल नीला यांनी केल आहे.

 

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, “पाच आणि सहा तारखेला चालले जाणाऱ्या विशेष गाड्यामध्ये मुख्य मर्गिकेवर परळ-ठाणे स्पेशल लोकल दुपारी १.१५ वाजता परळहून सुटेल आणि ठाण्यात १.५५ वाजता पोहोचेल. परळ-कल्याण विशेष लोकल दुपारी २.२५ वाजता परळहून सुटून दुपारी ३.४० वाजता कल्याणला पोहोचेल. परळ-कुर्ला विशेष लोकल दुपारी ३.०५ वाजता परळहून सुटेल आणि कुर्ला येथे ३.२० वाजता पोहोचेल.”

 

हार्बर मार्गावरील वाशी-कुर्ला विशेष लोकल ही वाशी येथून दुपारी १.३० वाजता सुटून २.१० वाजता कुर्ला येथे पोहोचेल. पनवेल-कुर्ला ही गाडी पनवेलहून दुपारी १.४० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे २.४५ वाजता पोहोचेल. वाशी-कुर्ला लोकल वाशीहून दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि कुर्ला येथे ३.४० वाजता पोहोचेल. कुर्ला-वाशी लोकल विशेष गाडी कुर्ला येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि वाशीला दुपारी ३.०० वाजता पोहोचेल. कुर्ला-पनवेल विशेष लोकल कुर्ला येथून दुपारी ३.३०वाजता सुटेल आणि पनवेलला ५.३० वाजता पोहोचेल. कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ल्याहून दुपारी ४ वाजता सुटून वाशीला ४.३५ वाजता पोहोचेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here