धरणगाव (उपसंपादक पी.एम.पाटील) : शहरासाठी धावडा येथून तापी नदीपात्रातून पाणी घेतल् जाते तेथून जॅकवेल द्वारा धरणगावयेथील फिल्टर प्लॅनवर पाणी येते त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया पूर्ण करून शहरातील एकूण ३६ झोन सब झोनद्वारे पाणीपुरवठा केला जातो आता सध्याच्या परिस्थितीत काही तांत्रिक अडचणी आल्यास १० दिवस अडचण न आल्यास ८ दिवसात पाणी येत आहे संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर पाणी मिळू शकते यासाठी प्रयत्न केले जात आहे.
ठेकेदाराच्या व मुख्याधिकारी यांच्या मागे पाठपुरावा करून प्रयत्न केला जात आहे. शुक्रवार दिनांक २९ रोजी तापी नदीवर जाऊन जॅकवेलची पाहणी करून धावडा येथील संपूर्ण प्रकल्पाला भेट दिली असता काही अडचणी आहेत कायमस्वरूपी शहराच्या प्रश्न मिटवण्यासाठी भविष्यात पुढे पाण्याच्या प्रश्न राहणार नाही यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या सोबत मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर बैठकीच् आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांनी दिली आहे.
धरणगाव शहरासाठी ८० लाख लिटर पाणी लागते,सध्या 50 लाख लिटर पाणी मिळत आहे एका तासामध्ये धावडावून ४ लाख लिटर पाणी उचलले जाते नियमित वीजपुरवठा राहिल्यास 20 तासांमध्ये उचलले जाते परंतु कुठे पाईपलाईन फुटल्यास किंवा वीज पुरवठा खंडित झाल्यास विलंब लागतो त्यामुळे या सर्व अडचणी उद्भवयालाच नको यासाठी आमच्या सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत स्वतंत्र फिल्टर प्लॅन वर डीपी बसवणे धावडा धरणावर सोलर बसवणे नव दोन मोटरी खरेदी करणेकरणे फिल्टर प्लॅन वरील किरकोळ दुरुस्त्या करणे नवीन वॉल टाकायचे आहेत काही व्हॉल दुरुस्त करणे त्याशिवाय पाणीपुरवठा नीट होऊ शकणार नाही.
यासंदर्भात प्रमुख ठेकेदार कपिल माखणे यांना आमदार गुलाबराव पाटील यांनी सूचना केल्या असून त्या संदर्भात त्यांच्याशी बोलले असता शहरांमध्ये पाणीपुरवठ्याचे काम करणारे कर्मचाऱ्यांची टीम ही लवकरात लवकर उपलब्ध करून देणे सध्याचे काम करत आहेत ते फक्त किरकोळ दुरुस्तीच्या कामासाठी आहे प्रमुख काम करणारे टीम आल्यानंतर लवकरात लवकर ही सर्व कामे पूर्ण होतील शहरातील लाडक्या बहिणी व नागरिकांचे पाण्यासाठीचे प्रश्न कायमस्वरूपी सुटतील. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,जीवन प्राधिकरणचे उपअभियंता के डी झाडे,शिवसेना शहर प्रमुख विलास महाजन,माळी महासंघाचे युवा नेते पवन भाऊ महाजन,ठेकेदारांचे मॅनेजर सूर्यकांत पाटील उपस्थित होते.







