महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद जित_ कुणे _ दो स्पर्धेसाठी बुद्धिस्ट कुंग फु मार्शल आर्ट वडूज टीमचे घवघवीत यश

karate-compitition

सातारा (प्रतिनिधी लव चव्हाण) : रविवार (दि. १) रोजी रायगड (नेरळ)येथे झालेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद जित_ कुणे _ दो स्पर्धेसाठी बुद्धिस्ट कुंग फु मार्शल आर्ट वडूज टीमला घवघवीत यश मिळाले आहे.

 

सदर स्पर्धेमध्ये .कुमारी. गौरी लव चव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी ( गोल्ड मेडल ), कुमारी. वैष्णवी शिवजी जगदाळे रा.गणेशवाडी.हुतात्मा परशुराम विद्यालय (गोल्ड मेडल ), कुमारी. सिद्धी रविंद्र गाडवे (वडूज गोल्ड मेडल), कुमारी. रुहि अस्लम नदाफ द न्यू ओक्सफोर्ड इंग्लिश मेडीयम स्कूल वडूज (सिल्व्हर मेडल) या चारही मुलींची नॅशनल खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

तसेच कुमार आदित्य अशोक राठोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी ब्राँझ मेडल), कुमार. चैतन्य लव चव्हाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी (ब्राँझ मेडल), कुमार. श्रीराज दादासो खरात सेवागिरी इंग्लिश मेडीयम स्कूल वडुज (ब्राँझ मेडल) याही मुलांना महा जित- कुने- दो स्पर्धमध्ये घवघवीत यश मिळाले आहे.

 

यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना प्रमोद फुलसुंदर राष्ट्रीय महासचिव तथा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मानव अधिकार फाउंडेशन भारत महासचिव महा जित – कुने – दो असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत मुलांना मेडल आणि प्रमाण पत्र देण्यात आले. प्रमुख मान्यवरच्या हस्ते सर्व सहभागी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.

 

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सातारा जिल्हा अध्यक्ष सुलतान मुजावर व सातारा जिल्हा उपाध्यक्ष कु . महेंद्र कुंभार व कराटे प्रशिक्षक रोहित माने यांचे मार्गदर्शन लाभले. वडूज येथे जास्तीत जास्त मुलांना मोफत कराटे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे असेही यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here