पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : खराडी भागात एका स्कुल बसला रस्त्यावर अचानक आग लागली. त्यानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला होता.बस ड्रायव्हर आणि बसमधील केअर टेकरने दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला.
आग लागल्याचे लक्षात येताच ड्रायव्हर आणि केअर टेकर यांनी बसमधील मुलांना लगेच खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला.खराडी भागातील फिनिक्स वर्ल्ड स्कुलची ही बस शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडायला निघाली होती.बसमधे पाचवी आणि सहावीत शिकणारी मुलं होती. मात्र प्रसंगावधान राखुन ड्रायव्हरने मुलांना खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला.
बसला आग नेमकी कशामुळे लागली ह्याचे कारण समोर आले नाही, पण या घटनेने स्कुल बसच्या ऑडीट व सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित होत आहे.







