पुणे (प्रतिनिधी अजय पवार) – पी-४ फाउंडेशन चे समन्वयक आणि विशेष पोलीस अधिकारी तसेच क्विक रिएक्शन फोर्स
कंपनीचे अजय नानासाहेब पवार यांना पोलिस प्रायव्हेट सिक्युरिटी पार्टनरशिप प्रोग्राम -पी४ चे मुख्य समन्वयक सचिन मोरे व सह कार्यकारी समन्वयक किंमतीलाल शर्मा यांच्या हस्ते कोरोना संकटात पोलिस प्रशासना ला सहकार्य केल्याबद्दल कोविड योद्धा म्हणून शनिवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी पी४ मुख्यालय, पुणे येथे सन्मानीत करण्यात आले.
कोरोना संकटात पोलिसांवरील वाढता ताण पहाता शहर पोलिस आयुक्तांनी नागरिकांतून विशेष पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. विशेष पोलिस अधिकारी म्हणून कर्तव्य करताना पी -४ खासगी सुरक्षा रक्षक एजन्सीच्या मालकांनी शहरातील विविध भागात एसपीओ म्हणून काम केले.
विशेष म्हणजे ज्या परिसरात कोरोनाचा संसर्ग जास्त झाला होता. अशा परिसरात या विशेष पोलिस अधिकाऱ्यांनी (एसपीओ) मोठे योगदान दिले. मग परिसरातील, सोसायट्यातील नागरिकांना दैनंदिन जीवनाश्यक वस्तू पोहच करणे असो की, पोलिसांसोबत बंदोबस्त असो, किंवा गरजू नागरिकांना मदतीचा हात अशी सर्व कामे यांनी केली. अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केलेला हा उपक्रमाच्या माध्यमातून शहरात सर्व परिक्षेत्रात हाती घेण्यात आला होता.









