आज आढळले ६०१ कोरोनाबाधित रुग्ण, ३४३ रुग्णांनी केली कोरोनावर मात
जळगाव (प्रतिनिधी) – आज (दि.१६) रविवारी कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोरोनाने आतापर्यंत सर्व रेकार्ड मोडले असून ६०१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ हजार २९७ झाली आहे. आज सर्वाधिक १२९ रुग्ण जळगाव शहरात आढळून आले आहेत. ३४३ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज विक्रमी संख्येने सापडलेल्या ६०१ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर १२९, जळगाव ग्रामीण ६८, भुसावळ १३, अमळनेर ८२ , चोपडा ४१, पाचोरा २३ , भडगाव २७ , धरणगाव २९, यावल ८, एरंडोल ४२, जामनेर ४ , रावेर ९, पारोळा ३२, चाळीसगाव ५७, मुक्ताईनगर २१, बोदवड १२ व इतर जिल्ह्यातील ४ असा समावेश आहे. दिवसभरात 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला त्यात भुसावळ तालुक्यात ३, चाळीसगाव, अमळनेर तालुक्यात प्रत्येकी २ व मुक्ताईनगर, चोपडा, पाचोरा धरणगाव आणि जळगाव शहरातील प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा समावेश असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय – जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.







