पिंपरी परिसरात नऊ किलो गांजा जप्‍त; तिघांना अटक

crime
File Photo

पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमिला टेमगिरे) : शहरामध्ये झोपडपट्‌ट्यांमध्‍ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्‍या कारवाईमध्‍ये सुमारे चार लाख ४४ हजार रुपये किमतीचा नऊ किलो गांजा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी केलेल्‍या कारवाईमध्‍ये सूरज पंडित पवार, हफिजअली मेहबुबअली सय्यद आणि मोहिनी आनंद जाधव या तिघांना अटक केली आहे.

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळाखडक येथे अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड यांना माहिती मिळालेल्‍या माहितीच्‍या आधारे सुरज पंडित पवार आणि हफिजअली मेहबूबअली यांना ताब्यात घेतले. सुरजच्या घरी तीन किलो ७२२ ग्रॅम गांजा पोलिसांना आढळला. दोन मोबाइल देखील पोलिसांनी जप्‍त केले.

दुसऱ्या कारवाईमध्ये निगडीत दत्त मंदिराच्या परिसरात शौचालयाच्या आडोशाला एक महिला थांबली होती. या महिलेकडे चौकशी करत तिच्या घरातून चार किलो गांजा जप्‍त केला. दोन्ही कारवाईमध्ये सुमारे चार लाख ४४ हजार रुपये किमतीचा नऊ किलो गांजा अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here