लोकनेते राजेंद्रशेठ पाटील यांच्या हस्ते मराठा क्रांती स्वराज्य संघटना दिनदर्शिका २०२५ अनावरण

मराठा क्रांती स्वराज्य संघटना

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय दिनदर्शिका सन २०२५ चे अनावरण राष्ट्रीय सल्लागार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मुंबई, पनवेल उरण तालुक्यातील लोकनेते उद्योजक राजेंद्रशेठ पाटील यांच्या हस्ते उलवे येथे संपन्न झाले. या वेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले मोहाचे देवेंद्र पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार भोसले यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले गेली तीन वर्षे सातत्याने या संघटनेची स्थापना केल्या नंतर अव्याहत पणे हजारो दिनदर्शिका प्रत्येक वर्षी छपाई करून देशभर खेडोपाडी संघटना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या पर्यंत पोहचवण्याचे काम केले जाते.

सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील सुंदर आकर्षक तसेच उत्कृष्ट छपाई काम केले आहे. असे बोलताना मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here