भुसावळ पोलिसांनी केले खतरनाक दरोडेखोरांच्या टोळीस जेरबंद; २ पिस्तूल, ५ तलवारी, ४ चाकू, १ फायटर जप्त

भुसावळ पोलीस

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) : पोलिसांनी सशस्त्र धाडसी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार जिवंत काडतूस, दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, पाच तलवारी, चार चाकू, एक फायटरसह मिरचीची पूड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

 

पोलिसांनी या प्रकरणी सात संशयित आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे मध्य प्रदेश, खंडवा भुसावळ, फैजपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत या घटनेबाबत माहिती दिली आहे.

 

जळगावच्या भुसावळ-नागपूर महामार्गालगत वाटर पार्क परिसरात सशस्त्र धाडसी दरोडाच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या घटनेत पोलिसांनी मॅकझिनसह दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, चार जिवंत काडतूस, पाच तलवारी तसेच चार चाकू, एक फायटर आणि मिरचीची पूड असा मुद्देमाल जप्त केला आहे. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यात सात दरोडेखोरांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे मध्य प्रदेश, खंडवा भुसावळ, फैजपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. या पोलिसांच्या कामगिरीची पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here