आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्याचे सृष्टी मुंढे व शिवराज मुंढे ने पटकाविले सिल्वर मेडल

कराटे

पुणे (प्रतिनिधी अविनाश मुंडे) : मिक्सल मार्शल आर्ट्स महासंघ इंडिया यांच्या वतीने आयोजित इंटरनॅशनल कॉम्बट इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये जुन्नर तालुक्यातील राजुर गावातील आदिवासी समाजातील सृष्टी अविनाश मुंढे आणि शिवराज अविनाश मुंढे या दोघांनीही चांदीचे पदक पटकावून जुन्नर तालुक्याचे तसेच आदिवासी समाजाचे नाव उंचावले आहे.

 

सृष्टी सध्या पुणे येथील केंद्रीय विद्यालयात 6 वी तर शिवराज श्री संत तुकाराम विद्यालय, लोहगाव येथे 5वी इयत्तेत शिक्षण घेत आहेत. दोघेही वॉरियर स्पोर्ट्स मधील ब्रिलियंट प्री प्रायमरी स्कूल, लोहगाव येथे कराटे क्लासचे शिक्षण घेत आहेत. त्यांचे कराटे शिक्षक श्री मुकेश वाल्मीकी यांनी या दोन्ही मुलांच्या यशावर समाधान व्यक्त केले आहे.

 

या यशस्वी कामगिरीबद्दल सृष्टी आणि शिवराज यांचे कुटुंबीय, मित्रमंडळ आणि शिक्षकवर्ग यांनी अभिनंदन केले आहे. ही दोन्ही मुले भविष्यातही अशाच प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या जुन्नर तालुक्याचे आणि राज्याचे नाव उंचावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here