पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : येथील भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या झाल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे. भाजप आमदाराच्या मामाच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. पुण्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या हद्दीत टिळेकर यांचे मामा वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सतीश वाघ यांचे आज सोमवारी पहाटे अपहरण झालं होतं.
सतीश वाघ हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होत. आमदार टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे शेवाळवाडीतून अपहरण झालं. आज सकाळच्या सुमारास सतीश वाघ यांच्या समोर सोलापूर रस्त्यावरील हॉटेलसमोर थांबले होते. त्यावेळी एका चारचाकी गाडीतून त्यांचं अपहरण करण्यात आलं. चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी सतीश वाघ यांचं अपहरण केलं होतं.

सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर या प्रकरणी पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. वाघ यांच्या मुलाने अपहरणाची तक्रार दिली होती. वाघ यांचं सोलापुरातील ब्लू बेरी हॉटेलसमोरू अपहरण झालं होतं. अपहरण करून सतीश वाघ यांना सोलापूरच्या दिशने अपहरणकर्ते घेऊन गेले होते.