रोडरोमियोच्या छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीने केली आत्महत्या

बलात्कार
file photo

जालना (प्रतिनिधी) : तरुणाच्या जाचाला कंटाळून या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. ही घटना जालना जिल्ह्यातील अंबड येथे ही घडली आहे. अकरावीमध्ये शिकणाऱ्या तरुणीने आज (१० डिसेंबर) सकाळी ब्लॅकमेलिंगला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले. राहत्या घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास जालना पोलिसांकडून सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यात छेडछाड आणि धमक्यांना कंटाळून महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने १० डिसेंबरला सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं. तिच्या या आत्महत्येमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला.

आरोपी तरुणाकडून रस्त्यावर सतत आडवून होत असलेली छेडछाड तसेच धमक्यामुळे या तरुणीने 3 डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करावी लागली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मात्र पीडितेचे काही फोटो आरोपीने सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तसेच इंस्टाग्रामवर मैत्रीच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करून पीडितेला धमकत राहिला.आत्महत्येपूर्वी तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर एका आरोपीला अटक देखील करण्यात आली. सोहम मिंधर नावाचा आरोपी अटकेत होता तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

सततच्या धमक्या आणि छेडछाडीला कंटाळून तरुणीने टोकाचे पाऊल उचलत गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या प्रकरणात मोठे रॅकेट असून अनेक मुलींना अशाप्रकारे त्रास होत असल्याचा आरोप आत्महत्या केलेल्या मुलीच्या आजोबांनी केला आहे. या घटनेमुळे जालन्यामध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here