नांदेडच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या शहर प्रमुखाचं अपहरण

gaurav-kotmire

नांदेड (प्रतिनिधी) : येथील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख गौरव कोटगिरे यांचे अपहरण झाल्याची घटना समोर येत आहे.

 

याप्रकरणी कोटगिरे यांची पत्नी आणि त्यांचा ड्रायव्हर यांचा जबाब पोलिसांकडून नोंदवण्यात येत आहे. नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील बाफना टी पाईंटवरून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कोटगिरे यांचे अपहरण झाल्याचं सांगितले जात आहे. कोटगिरे हे कट्टर शिवसैनिक असून ते सोशल मीडियावर ही सक्रिय असतात. नांदेड शहर उत्तर आणि दक्षिण या विधानसभा मतदारसंघातदेखील ते सक्रिय होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here