नवजीवन प्लसमध्ये रिटेल एम्प्लॉईज डे साजरा; नोकरीच्या ठिकाणी हसतमुख राहिल्यास जीवन सुंदर असल्याचा अनुभव – शंभू पाटील

नवजीवन प्लस

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : नोकरीच्या ठिकाणी आपला विविध प्रवृत्तीच्या नानाविध लोकांशी संपर्क येत असतो. मात्र आपण कोणत्याही कटू शब्दाला गोड शब्दात उत्तर दिल्यास तसेच दिवसभर हसतमुख राहिल्यास हे जीवन सुंदर असल्याचा अनुभव आपणांस मिळतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील यांनी केले. रिटेल एम्प्लॉइज डे निमित्ताने नवजीवन प्लस मध्ये आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधतांना बोलत होते.

 

जगभरात विविध सुपरशॉमधून अथक परिश्रम घेत विक्रीचे काम करणाऱ्या ओटीसी (ओव्हर दि काउन्टर) कर्मचाऱ्यांचा सन्मान दरवर्षी १२ डिसेंबर रोजी करण्यात येतो. त्यासाठी हा दिवस ‘रिटेल एम्प्लॉइज डे’ म्हणून साजरा केला जातो. सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या नवजीवन प्लस सुपरशॉपमध्येही हा दिवस साजरा करण्यात आला.
नवजीवन प्लस सुपरशॉपच्या सर्व शाखांमधील कर्मचाऱ्यांचा या निमित्ताने स्नेहमिलन सोहळाही संपन्न झाला. विविध शाखांतून न कंटाळता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कष्टांचे कौतुक यावेळी करण्यात आले. यावेळी पुढे बोलतांना शंभू पाटील म्हणाले की, स्वतः नेहमी आनंदी , सुखी, समाधानी व हसतमुख रहाण्यासाठी एकच काम करावे आपल्यापेक्षा आपल्या समोरच्या माणसांच्या गरजा ओळखाव्यात, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, सुख, समाधान आणि हवं ते मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हसू हेच आपल्यासाठी सर्व काही आहे. कारण आपल्या सभोवतालची माणसे हसतमुख असतील तर आपल्याला काळजी करण्याचे कारण उरत नाही. हेच आपल्या कामाचे समाधान मानणाऱ्या प्रत्येक माणसाला हे जीवन सुंदर असल्याचा अनुभव मिळतो. हाच अनुभव आपल्याला सुखाची झोप देतो यापेक्षा समाधान ते कोणते .

 

यावेळी नवजीवन प्लस सुपरशॉपच्या जळगावातील बहिणाबाई गार्डन चौक, महाबळ चौक, कालिंकामाता मंदिरासमोरील स्टोअर तसेच शहादा, शिरपूर, अमळनेर येथील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवजीवन प्लसचे संचालक अनिल कांकरिया यांच्यासह सुरेश ललवाणी, चंद्रप्रकाश सांखला, महेश अहिरराव, निखिल संचेती, चेतन मिस्त्री, निखिल जैन, निखिल संचेती, वैशाली पवार, शारदा शिंदे, अर्चना सपकाळे, दिपाली आमोदकर, विक्की रायसिंग, रामकृष्ण जोशी, राहुल इंगळे, दिनकर राजपूत, जितेंद्र महाजन, श्रूती पांडे, सोनाली सपकाळे आदींसह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here