९८ व्या साहित्य संमेलनातील कार्यक्रमांची पत्रकार परिषदेत दिली माहिती

साहित्य संमेलन

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : सरहद पुणे आयोजित दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संमेलनाचे संमेलनाध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी त्यांच्या ६ जनपथ या दिल्लीतील निवासस्थानी दिल्लीमधून महाराष्ट्रासाठी पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांशी वार्तालापाचा कार्यक्रम ठेवला होता.

 

यामध्ये मा. केंद्रीय मंत्री पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयजी नहार, आरंहम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश पगारिया, सरहदचे लेशपाल जवळगे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेण्यात आली.

 

७० वर्षानंतर आणि महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी दिल्ली येथे होत आहे. आज या संमेलनाच्या बाबतीत विविध विषयांवर पत्रकारांसोबत संवाद साधला आणि संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध कार्यक्रमाची आखणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here