बुलंद पोलीस टाइम्सच्या कायदेशीर सल्लागारपदी ॲड. दिनकर पाटील यांची नियुक्ती

दिनकर पाटील

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : एरंडोल तालुक्यातील ॲड. दिनकर पाटील यांची बुलंद पोलिस टाइम्स साप्ताहिकच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती संपादक सुनील पाटील यांनी केली.

 

त्यांच्या या नियुक्तीबद्दल संघर्ष समिती एरंडोलतर्फे त्यांचा निवासस्थानी छोटेखानीसत्कार करण्यात आला. सदर सत्काराच्या वेळेस संघर्ष समितीचे अध्यक्ष रवींद्र लाडगे, तसेच उपाध्यक्ष नामदेव तोडकर पाटील, सचिव स्वप्नील सावंत व खजिनदार दिनेश चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते गजानन तात्या पाटील व बुलंद पोलीस टाइम्सचे संपादक सुनील पाटील उपस्थित होते.

 

मान्यवरांच्या हस्ते दिनकर पाटील यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्यानंतर आभार सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here