जळगाव (जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे) : फैजपूर येथील धनाजी नाना विद्यालय येथे बालविवाह प्रकल्प अधिनियम २०२२ च्या अनुषंगाने माननीय प्रांत अधिकारी बबन काकडे फैजपूर भाग यावल आणि तालुक्यातील सर्व ग्रामसेवक पोलीस पाटील गटविकास अधिकारी मुख्याधिकारी सरपंच आशा वर्कर यांना बालविवाह संदर्भमध्ये सोमवारी (दि.१६) मार्गदर्शन करण्यात आले.
बालविवाहा मुळे बालकांची सुरक्षा आरोग्य आणि विकासाला बाधा येते त्यांची स्वप्न साकार होण्यापासून थांबतात बालविवाह हा एक सामाजिक कलंक आणि अपराध आहे आपण बालविवाह मुक्त भारत कसे करायचे या संदर्भात उपाय योजना करण्यात आली बाल व किशोर कामगार व पुनर्वसन बाल अपव्यापार प्रतिबंध बाल लैंगिक शोषण प्रतिबंध माहिती मार्गदर्शन करण्यात आले.
असिस टू जस्टीस प्रकल्प अतिशय संवेदनशील पणे ग्रामीण भाग व शहरी भागामध्ये ची आखणी करण्यात आली आहे प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे याकरिता जळगाव जिल्ह्यात आधार बहुउदेशीय संस्था अमळनेर यांना जळगाव जिल्हा प्रशासनास सहाय्य करण्याकरिता अधिकृत नेमणूक करण्यात आली आहे तसेच जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच गटविकास अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत गावामध्ये कार्यक्रम राबवण्याबाबत मार्गदर्शन केले बालविवाह मुक्त भारत यावल तालुका कॉर्डिनेटर अशोक तायडे यावल रावेर तहसीलदार प्रांताधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते.







