सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : आज (दि.२५) रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जानोरी शिवारातील जंगलामधे ४ गावठी हातभट्या तसेच तयार दारू नष्ट करण्यात आल्या असून त्याबाबत सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापुढे सुद्धा अशीच कारवाई चालू राहणार असल्याचे सावदा पोलीस स्टेशनचे सपोनी विशाल पाटील यांनी सांगितले आहे. सदरची कारवाई ही मा. वरिष्ठांचे आदेशाने सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील, सहायक फौजदार खोडपे, पोलीस नाईक बाविस्कर, पोलीस नाईक सैंदाने, पोलिस नाईक तडवी, पो कॉ जोशी यांचे पथकाने केली आहे.







