पुणे (संपादक सुनिल पाटील) : वाघोली येथील दुर्दैवी घटनेमध्ये डंपर खाली ९ जण चिरडले गेले तर तिघांचा जागीच मृत्यू झाला. एक गंभीर असून, पाच जण जखमी आहेत. सदर घटेची माहीती मिळताच आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांच्या पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे पोचले ते सर्व आमंरावती मंगरुळ चौवाळा येथील होते आदिवासी एकाच कुटुंबातील तीन जण मृत्यूमुखी पडले तर पाच जण गंभीर जखमी आहेत.
सदर माहिती कळताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले, आमदार कटके, पोलीस उपआयुक्त मनोज पाटील , डी सी पी जाधव यांनी घटनेच्या ठिकानी भेट दिले पिडीत कुटुंबातील लोकांची भेट घेतली.
पुणे व हवेली तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्याच्या दुर्लक्षितपणामुळे व पारधी समाजाकडे टाकाऊ नजरेने पाहिल्यामुळे वाघोली येथील दुर्दैवी घटना घडली आहे. जर आदिवासी पारधी कुटूंबाना जाचक अटीच्या नावाखाली शासकीय सवलती वंचित ठेवले त्यांना अंतोदय अतंर्गत सवलती दिल्या असत्या तर या समाजाची फरपट थांबली असती…..
– नामदेव भोसले
पहिल्यांदाच आदिवासी कुटुंबातील तिन जण मृत्युमुखी पडले तर मृत्य व्यक्तींना प्रत्येकी पिडितांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये तर मृत दोन मुलाना अडीच लाख तर पिडीत व्यक्तीना १ लाख मदत देण्यास जाहीर केले. सदर आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे पिडीत कुटुंबांना न्याय मिळाला. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अन्न औषध मंत्री नरहरी झिरवळ यांना आदिवासी समाजसेवक.नामदेव भोसले , मतीन भोसले, सुनिता भोसले, बाबा भोसले यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.







