एरंडोल (कायदेशीर सल्लागार ॲड.दिनकर पाटील) : शहरातून नॅशनल हायवे फोरवे गेल्यामुळे शहराच्या सौदर्यात भर पडून नागरिकांना योग्य त्या सुविधा मिळायला हव्या होत्या परंतु शहरवासीयांच्या अपेक्षा भंग होतांना दिसून येत आहेत. त्यामुळे या समस्या सोडवा नाहीतर सामुदायिक आंदोलन करावे लागेल अशा आशयाचे निवेदन एरंडोल शहर संघर्ष समिती चे वतीने अध्यक्ष श्री रवींद्र लाळगे,उपाध्यक्ष श्री नामदेव पाटील व इतर पदाधिकारी यांनी नॅशनल हायवे आथारिटी आफ इंडिया कार्यालय जळगाव चे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांना दिले.
निवेदनात आवश्यक समस्या नमूद करून शिवाजी पवार यांचे शी सविस्तर चर्चा केली एरंडोल बस स्टॉप ते दत्त मंदिर पुलापर्यंत सर्व्हीस रोड नियमानुसार तयार करावेत,शहरातील बीएस एन एल व कासोदा चौफुली येथे बोगदा तयार करून जिवितहानी टाळावी,धरणगाव चौफुली येथे धरणगाव च्या दिशेने हायमास्ट लप बसविण्यात यावा,कृष्णा हॉटेल ते दत्त मंदिरा पर्यंत पथदिवे बसवावेत व तात्काळ सुरु करावेत, सुचना फलकावर शुद्ध मराठीत लेखन असावे जसे पद्माळय , एरंडोळ येथे ळ ऐवजी ल असावा,शहरात हायवे लगत गटारी पुर्ण कराव्यात टुटलेले ढाबे लवकरच दुरुस्त करावेत विशेष म्हणजे आमदार साहेब यांचे कार्यालयासमोर च ढाबा तुटलेला आहे, गतिरोधक नियमानुसार योग्य असावेत त्यांना रंग देण्यात यावा.अशा समस्या ह्या फारस्या अवघड नाहीत, परंतु शासन व प्रशासन टाळाटाळ करत असून शहरातील शांततेचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येते. ही बाब अतिशय गांभीर्याने घेण्याची आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियते मुळे बरेच अपघात होऊन जिवितहानी झाली आहे. याला प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे संघर्ष समिती संचालक मंडळ आंदोलन करणार असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. निवेनावर अध्यक्ष रवींद्र लाळगे उपाध्यक्ष नामदेव पाटील सचिव स्वप्नील सावंत,कोषाध्यक्ष दिनेश चव्हाण, संचालक ॲडव्होकेट दिनकरराव पाटील, तुकाराम पाटील, प्रकाश पाटील, नानाभाऊ मिस्तरी, आर झेड पाटील,प्रविण महाजन,प्रमोद महाजन,बाविस्कर, राजेंद्र महाजन, गजानन पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत. प्रकल्प संचालक यांनी या निवेदनाची दखल घेऊ न त्वरित कामे करू असे आश्वासन या प्रसंगी दिले.







