माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एम्समध्ये दाखल

manmohan singh

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – माजी पंतप्रधान आणि काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची प्रकृती खालावल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले. 92 वर्षीय सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले. सिंग यांना हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एम्स प्रशासनाने अद्याप स्पष्टपणे काहीही सांगितलेले नाही. परंतु आपत्कालीन विभागातील एका डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे कारण सध्या समजू शकलेले नाही.

 

https://twitter.com/PTI_News/status/1872318014718402918

 

दरम्यान, रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे कर्नाटकातील बेळगावीहून दिल्लीत परतत आहेत. मनमोहन सिंग यांची मुलगी एम्समध्ये उपस्थित आहे. खासदार डॉ. प्रियंका गांधी वाड्रा दिल्लीच्या एम्समध्ये पोहोचल्या आहेत. काही वेळात सोनिया गांधीही पोहोचणार आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here