कापुरबावडी येथे २ वर्षापूर्वी झालेल्या फायरींगच्या गुन्हयातील आरोपी टोळीसह गुन्हे शाखेकडून जेरबंद

फायरींग

ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : दि.०७/१०/२०२२ रोजी रात्रौ ०८.४० वा. चे सुमारास संदिप राजाराम अडसुळ हे गणेशवंदन बिल्लीग, स.नं. ३०२, भारत गॅस जवळ, लोढा सर्दीस रोड, माजिवाडा, ठाणे या घराचे बाहेर दरवाजा समोर असताना त्यांचे व्यवसायातील आर्थिक देवाण-घेवाणीच्या भांडणातुन एका अनोळखी इसमाने अग्निशस्त्रातुन त्यांचे उजवे बरगडीवर गोळी फायर करून त्यांना गंभीर दुखापत करून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून जखमी यांची पत्नी सी रोहीणी संदिप अडसुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कापुरबावडी पो.स्टे गु.रजि.नं. ३२९/२०२२ भादविक ३०७, आर्म अॅक्ट ३,२५, २७ मपोअ १३५, ३७(१) अन्वये दिनांक ०८/१०/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास घटक ५, वागळे, ठाणे यांचेकडुन करण्यात येत होता.

 

नमुद गुन्हयातील आरोपीत हे सन २०२२ पासुन त्यांचे अस्तीत्व लपवुन फिरत होते. दरम्यानवे काळात ते उत्तर प्रदेश येथे देखिल गेले होते. सदर गुन्हयात फायरींग करणारा आरोपी प्रतिक शर्मा हा खाडी रोड, कोलशेत, ठाणे येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी दि.२५/१२/२०२४ रोजी प्राप्त झाल्याने तात्काळ गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणे येथील पोलीस पथक आरोपीचा शोध घेणेकामी खाडी रोड, कोलशेत, ठाणे येथे पाठविले असता सदर गुन्हयातील पाहीजे आरोपीत १) प्रतिक संतराम शर्मा, वय २४ वर्ष रा. कोलशेत, खालचे गांव, ठाणे २) राजकुमार गोविंद हांडे, वय ३२ वर्ष रा. मनोरमानगर, ठाणे, हे तेथे आल्याने त्यांना सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक तपास करून त्यांचे साथिदार ३) आकांत प्रविन पोवळे, वय २५ वर्ष, रा. डिवाईन स्कुल समोर, कशेळी, भिवंडी, ठाणे ४) तुषार दशरथ पवार वय-४९ वर्षे, रा. हायलँड, ढोकाळी, कोलशेत, ठाणे ५) रोहित सुर्यकांत गंगोत्रे, वय २६ वर्ष, रा. मनोरमा नगर, ठाणे यांना देखिल सदर गुन्हयात दि.२५/१२/२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, घटक ५, वागळे, ठाणे कडील स.पो.निरी/शरद पाटील यांचेकडून करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे.

 

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुंबरे सो, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ.श्री पंजाबराव उगले साो, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री अमरसिंह जाधव सो।, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (शोथ २) श्री राजकुमार डोंगरे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) श्री शेखर बागडे सोो यांचे मार्गदर्शनाखाली वागळे युनिट-५, ठाणे थे वपोनि/सलील भोसले, पो. निरी/नितीन पाटील, सपोनि/भुषण शिंदे, सपोनि/पल्लवी ढगेपाटील, सपोनि/शरद पाटील, पोहवा/विजय काटकर, पोहवा/सुशांत पालांडे, पोहवा/रोहिदास रावते, पोहवा/सुनिल निकम, पोहवा/संदिप शिंदे, पोहवा/विजय पाटील, पोहवा/कार्ले, पोना/रघुनाथ गार्डे, पोना/तेजस ठाणेकर, मपोहवा/सुनिता गिते, मपोहवा/मिनाक्षी मोहिते, मपोशि/निलम महाले, पोशि/यश यादव या पथकाने केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here