भंगाराच्या दुकानात आलेली टाकी फोडतांना स्फोट; एकाचा मृत्यू

pune-cylinder-blast

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : भंगाराच्या दुकानात आलेली टाकी फोडत असताना तिचा स्फोट होऊन त्यात एका कामगाराचा मृत्यु झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत. ही बी टी कवडे रोडवर सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांनी घडला.

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे अधिकारी प्रमोद सोनावणे यांनी सांगितले की, बी टी कवडे रोडवर महंमद सय्यद यांचे भंगाराचे दुकान आहे. या दुकानात एक सिलेंडरसारखी छोटी टाकी आली होती. ही टाकी मेहमुद शेख हा फोडत होता. त्यावेळी या टाकीचा स्फोट झाला. डोके खाली करुन मेहमुद शेख टाकी फोडत असल्याने टाकीचा स्फोट झाल्यावर त्याच्या डोक्याच्या चिंधड्या उडाल्या. तो जागीत गतप्राण झाला. त्याच्या शेजारी असलेले किशोर साळवे (वय ४०), दिलीप मिसाळ (वय ४०) आणि महंमद सय्यद (वय ५०) हे तिघे टाकीचे तुकडे लागून जखमी झाले.

 

टाकी फुटल्याचा आवाज येताच आजू बाजूचे लोक धावुन आले. त्यांनी जखमी कामगारांना तातडीने ससून रुग्णालयात रवाना केले. अग्निशमन दलाचे जवान, मुंढवा पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले असून ते घटनेची माहिती घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here