रिक्षा दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात मायलेकाने जीव गमावला

accident
file photo

नागपूर (प्रतिनिधी) : रिक्षा दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात माय-लेकाने जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. रिक्षा चालक रोहित साखरे व त्याची आई करुणा साखरे असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ” हिंगणावाडी बायपासवर मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास प्लास्टो कंपनीसमोर रिक्षा चालक रोहित साखरे व त्याची आई करुणा साखरे एक खाजगी कार्यक्रम आटोपून घरी जात असताना ही घटना घडली आहे. रिक्षावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव रिक्षा अगोदर दुभाजकावर आदळला व उलटला.

 

चालक रोहित व मागच्या सीटवर बसलली त्याची आई करुणा या दोघांच्याही डोक्याला, हातापायाला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here