क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सायबर भामट्यानी केली ९२ हजाराची फसवणूक

cyber-thief
file photo

नाशिक (प्रतिनिधी कुबेर जाधव) : क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भामट्यानी एकाची ९२ हजार रुपयाची फसवणूक केली. या बाबत पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी भाऊसाहेब दत्तू कड (रा.वृंदावननगर, कामटवाडा, अंबड) हे अंबड एमआयडीसीतील लुसी इलेक्ट्रिकल इंडिया प्रा. लि. कंपनीत काम करीत होते. त्यावेळी अज्ञात मोबाईलधारकाने त्यांच्या मोबाईलवर फोन करून रवी मिश्रा बोलत असल्याचे सांगितले.

 

त्यानंतर कड यांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून ॲक्सिस बँकेच्या ॲपमध्ये ऑप्शनमध्ये व मोबाईलच्या टेक्स्ट मेसेजमध्ये जाण्यास सांगितले. फिर्यादी ही कृती करीत असताना अज्ञात भामट्याने कड यांच्या बँक खात्यातून क्रेडिट कार्डाद्वारे ९२ हजार १२१ रुपये परस्पर काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रवी मिश्रा नामक व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक उगले करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here