जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जळगाव शहरातून जाणाऱ्या हायवेवर दररोज होणाऱ्या अपघात नागरिकांना जीव गमवावा लागतो आहे. याबाबत येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात आमदार राजूमामा भोळे यांनी जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान शहरातून जाणाऱ्या हायवेवर दररोज होणाऱ्या अपघात नागरिकांना जीव गमवावा लागतो आहे. या समस्येवर पर्यायी व्यवस्था करणे, हायवे बायपासचे काम त्वरित पूर्ण करणे व रस्त्याच्या कामाचा वेग तसेच हायवेवर होत असणारे अतिक्रमण याचा आढावा घेतला. उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावी जेणेकरून नागरिकांच्या जीव धोक्यात येणार नाही यासंदर्भात काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा करुन संबंधितांना त्याबद्दल सूचना करण्याची विनंती केली.







