पंढरपूर येथील तहसिल कार्यालय अतिक्रमणाच्या विळख्यात; खाजगी दलाल, एजंट यांचा मनमानी कारभार

पंढरपूर

पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) – येथील तहसील कार्यालय म्हणजे, आवो जावो, घर तुम्हारा, असा प्रकार झाला आहे, सरकारी जागेत खाजगी टपरी धारकांचे अतिक्रमण झाले असून खाजगी एजंट, दलाल यांचा सुळसुळाट वाढला आहे.

 

अनेक सरकारी कामात हस्तक्षेप व लुडबुड होत आहे अनधिकृत, परवाना नसलेले लेखनिक, स्टॅम्प वेंडर कुठेही थोडी रिकामी जागा दिसली की ठाण मांडून दुकानदारी चालू करीत आहेत. कोणतेही भाडे, मोबदला न देता अर्धा ते एक गुंठा जागा या लोकांनी बळकावल्या असून तहसिलदार यांना काहीच बोलत नसून आक्षेप घेत नाहीत. अनधिकृत लेखनिक एका अर्ज लिहून देण्याचे पाचशे ते एक हजार रू. उकळत आहेत.

 

जिल्हाधिकारी यात लक्ष देऊन, पंढरपूरच्या तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस देणार का? कोणाच्या आशीर्वादाने अतिक्रमण केले आहे असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. अधिकृत स्टॅम्पवेंडर यांची संघटनेला विचारले असता व किती अधिकृत लोकं आहेत याची माहिती द्या असे म्हटले असता माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तहसील कार्यालयाच्या आवारा मधील किंवा कंपाउंडच्या बाहेरील अतिक्रमण केव्हा काढणार ?

 

तहसील कार्यालय मध्ये ये जा करणाऱ्या नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. अनाधिकृतपणे एजंट व बोगस लेखणी करत काही एजंट बसत असतात वृद्ध महिलेंची फसवणूक ही करतात याला जबाबदार कोण ? अनाधिकृत लेखणी करत बसणाऱ्या एजंटावरती कारवाई करणार का तहसीलदार सचिन लगुटे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तहसील कार्यालयाच्या कंपाउंडच्या आत मध्ये बसण्याचा अधिकार त्या एजंटांना कोणी दिला, असे प्रश्न सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे. अनेक गरजू, अशिक्षित लोकांना फसविले जाते, चुकीचे अर्ज खरडून दिले जातात. या अनधिकृत लोकांनी जागा अडविल्याने दुचाकी वाहने पार्क करता येत नाहीत, रस्त्याच्या पलीकडे दुचाकी वाहने लावावी लागत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here