सोलापूरात नववर्षाच्या स्वागतासाठी कडक पोलिस बंदोबस्त; ८०० पोलिसांचा ताफा तैनात

पोलिस

पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) – ३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागतासाठी सोलापूर शहरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ८०० हून अधिक पोलिस, तीन डीसीपी, चार एसीपी यांच्या नेतृत्वात सुरक्षेची जबाबदारी सांभाळणार आहेत.

शहरात ७२ फिक्स पॉईंट्स, १३ नाकाबंदी पॉईंट्स, आणि ६ स्ट्राइकिंग फोर्ससह गस्त लावण्यात आली आहे. मुलींच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक तैनात असून गुन्हे शाखेची ६ पथके आणि साध्या वेषातील गुप्त पोलिस निरीक्षक देखील कार्यरत राहणार आहेत.

मद्यप्राशन करून वाहन चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, फटाके फोडणे किंवा सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त दिपाली काळे यांनी सांगितले. शहरवासीयांनी आनंदात व सुरक्षिततेने नववर्ष साजरे करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here