नाशिक (जिल्हा क्राइम रिपोर्टर अर्जुन वेताळ) : जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मुळगाथांचे लेखनकर्ते राष्ट्रसंत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३३६ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात पाथर्डी परिसरात समाजाने घेतलेल्या जागेवर साजरा करण्यात आली.
संताजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने ४०० विद्यार्थ्यांचा गुणगौरव व समाजातील मान्यवरांचा समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मान सोहळा पार पडला. व तसेच नाशिक पश्चिम च्या आमदार सौ सिमाताई महेश हिरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन शेलार, डॉ. गोविंद चौधरी, माजी नगरसेवक भगवान दोंदे, सुदाम कोंबडे, बाळकृष्ण शिरसाठ, एकनाथ नवले, बळवंत धोंगडे, हिरेन चौधरी, रमेश चौधरी, डॉ सुनिल चौधरी, विठ्ठलराव शेलार, जे.टी.चौधरी, सौ सोनाली चोथेपाटील, प्रमोद जोगळेकर, संदिप कोते,एल.सी.चौधरी, नितीन पवार, विनायक सोनवणे, राजेंद्र गायकवाड हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष रविंद्र चौधरी यांनी केले.अध्यक्षस्थानी श्री बी.जी.चौधरी हे होते. सुत्र संचालन योगिता क्षिरसागर यांनी केले.आभार प्रदर्शन मंडळाचे कार्याध्यक्ष अर्जुन वेताळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे सचिव वसंत चौधरी, खजिनदार विजय चौधरी, डिगंबर नेरकर, राहुल गणोरे, रघुनाथ चौधरी, किशोर चौधरी, उमाकांत चौधरी, राजेंद्र लोखंडे, अमर व्यवहारे, शुभम नेरकर , अभिजित बारगजे, कैलास चौधरी, किरण वेताळ, बापु चौधरी यांनी परिश्रम घेतले. सर्वांगिणी महिला मंडळ उपाध्यक्ष वर्षा वेताळ, सचिव सुनिता बोरसे, भारती चौधरी, निशा चौधरी, संगिता चौधरी, प्रमिला चौधरी, रत्ना चौधरी, सविता किर्वे, नम्रता चौधरी, सोनाली चौधरी, शोभा चौधरी, मनिषा चौधरी, ऍड.सुवर्णा सोनवणे, मिराबाई चौधरी, निर्मला चौधरी, कौशल्या चौधरी, विमल चौधरी, उषा चौधरी, संगिता कोते, संगिता पवार, सरिता सोनवणे, मनिषा मोरे, पुष्पा चौधरी,अनिता चौधरी. मोठ्या संख्येने समाज बांधव भगिनी व विद्यार्थी उपस्थित होते.







