पुणे येथे शिक्षिकेचा १७ वर्षीय विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार

लैंगिक अत्याचार

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या नामांकित शाळेतील २७ वर्षीय शिक्षिकेने दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. हा संपूर्ण प्रकार शाळेतीलच स्टाफ रूम मध्ये घडला. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मध्यवर्ती परिसरात असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पीडित १७ वर्षीय विद्यार्थी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी शिक्षिका ही देखील त्याच शाळेत आहे. २७ डिसेंबर रोजी पीडित विद्यार्थी हा दहावीची पूर्व परीक्षा देण्यासाठी शाळेत आला होता. यावेळी आरोपी शिक्षिकेने त्याला शारीरिक संबंधासाठी प्रोत्साहित करून उत्तेजित केले. त्यानंतर शाळेतीलच स्टाफ रूममध्ये घेऊन जात आपल्या शारीरिक सुखासाठी त्याचा वापर केला.

 

दरम्यान, शाळेतील स्टाफ रूम मध्ये सुरू असलेल्या या कृत्याची खबर शाळेच्या मुख्याध्यापिकेला लागली. त्यांनी त्यांनी स्टाफ रूममध्ये येऊन पाहणी केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शाळा प्रशासनाने याची माहिती संबंधित मुलाच्या कुटुंबीयांना दिली. मुलाच्या आईने खडक पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम ७, ९ (फ), ११, ६, १२, १४ नुसार गुन्हा दाखल करून संबंधित शिक्षकेला अटकही केली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या शिक्षिकेची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here