विज चोरीचा गुन्हा : लाच मागणारे महावितरणचे दोन वायरमन एसीबीच्या जाळ्यात

लाचलुचपत
file photo

जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) – विज चोरीचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर दीड लाखाची मागणी करुन एक लाख रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केल्यामुळे जळगाव येथील शनीपेठ पोलिस स्थानकात महावितरणच्या दोन कर्मचा-याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

 

या कारवाई बाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे २ डिसेंबर रोजी भरारी पथकाने एकूण पाच विज मिटर काढून तुमचे वीज मीटर नादुरुस्त आहे. तुमच्यावर जर विज चोरीचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर एकूण दीड लाख रुपयाची मागणी केली होती.

 

त्याबाबत तक्रारदार यांनी ३ डिसेंबर रोजी लाप्रवि जळगांव येथे समक्ष येऊन तक्रार दिली होती. तक्रारदाराने यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे लाच मागणी पडताळणी केली असता पंचा समक्ष यातील आलोसे १ व २ यांनी एका विज मीटरचे ३० हजार रुपये याप्रमाणे एकूण दीड लाख रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडीअंती एक लाख रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये महावितरणचे वायरमन धनराज वायरमन, व गोटू वायरमन यांच्यावर कारवाई करण्यात करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here