नाशिक (उपसंपादक सी.पी. पवार) : प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणा-या एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.. धुमाळ पॉईंट भागात करण्यात आलेल्या कारवाईत संशयिताच्या ताब्यातून सुमारे ३८ हजार रूपये किमतीचे ७५ गट्टू हस्तगत करण्यात आले असून, याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुमाळ पॉईट भागात सुनील ऊर्फ हेमराज मनोहर गायकवाड (रा. मधुबन कॉलनी, पंचवटी) हा तरूण नॉयलॉन मांजा विक्री करीत असल्याची माहिती भद्रकाली पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.३०) सायंकाळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.
मीना कलेक्शन या दुकान परिसरात संशयित बंदी असलेल्या मांजाची विक्री करीत होता. संशयिताच्या ताब्यातून ३७ हजार ५०० रुपये किमतीचे ७५ गट्टू हस्तगत करण्यात आले असून याबाबत अंमलदार योगेश माळी यानी फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार साळुंके करीत आहेत.







