भारतीय बौद्ध महासमभेतर्फे तहसिलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन

चोपडा (संदीप ओली) – दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभा चोपडा तालुका व शहर कार्यकारिणीच्यावतीने निवासी नायब तहसीलदार राजेश पौळ यांना निवेदन देण्यात आले.यावेळी सदर निवेदनात देशभरात बौद्ध समाजावर होत असलेल्या अन्याय,अत्याचार व हल्ले तसेच बौध्दांच्या श्रद्धा स्थानांवर होत असलेले हल्ले तसेच साकेत नगरात अनेक बौद्ध अवशेष सापडले असूनही याठिकाणी बुद्धविहार बांधण्यास कोणतीही कार्यवाही होत नाही. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान “राजगृह”या कोट्यावधीच्या श्रद्धास्थानावर भ्याडहल्ला करून दहशत निर्माण केली.त्यामागील सूत्रधार कोण?पकडलेल्या हल्लेखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात यावा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस्मारक “चैत्यभूमी”ला झाकून दृष्टीआड होत असलेले बांधकाम व अतिक्रमणास परवानगी देण्यात येऊ नये.त्याच प्रमाणे पदोन्नतीतील आरक्षण सन 2017 पासून बंद आहे ते देण्यात यावे.तसेच राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीतील उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी.
केंद्रीय अभ्यासक्रमाच्या आय. सी.एस.ई.च्या पुस्तकात महात्मा गांधी,पंडित जवाहरलाल नेहरू, यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी,माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन व देश-विदेशातील सगळ्या विद्वानांची फोटोसह माहिती या पुस्तकात दिली असून भारतीय संविधान निर्माते,सामाजिक एक सुधारणाचे प्रणेते,स्त्रियांच्या हक्काचे जनक इत्यादीद्वारे देश घडवण्याचे काम करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या पुस्तकात विसर पडणे म्हणजे हे जणू मनुवादी विचार सरणीच असल्याचे स्पष्ट होते.हे अपमान करणारे पुस्तक त्वरित मागे घेण्यात यावे.इत्यादी मागण्यांबाबत आज निवेदन देण्यात आले. यावेळी चोपडा तालुका अध्यक्ष बापूराव वाणे,शहराध्यक्ष भरत शिरसाठ,जिल्हा संघटक हितेंद्र मोरे,माजी तालुकाध्यक्ष सुदाम करंकाळ,उपाध्यक्ष भगवान(छोटू) वारडे ,प्रा.एम.बी.हांडे तसेच भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here