३० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवत पुण्यातील अभियंत्याची १ कोटी १० लाखाची फसवणूक

फसवणूक
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) – कंपनीत गुंतवणुक केल्यास ३० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून एका अभियंत्याची तब्बल १ कोटी १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुंतवणुक केलेले पैसे परत मागितल्यावर या अभियंत्यासह त्याच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

 

याप्रकरणी अभियंत्याने यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी लक्ष्मीकांत नथुराम त्रिवेदी (रा. भारत श्री अपार्टमेंट, एरंडवणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १ ऑगस्ट २०२० ते ३० जून २०२४ दरम्यान घडला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मलेशिया येथे डिझायन कन्सलटंट म्हणून काही वर्षे नोकरीला होते. तेथील करार संपल्यावर ते पुण्यात आले. त्यांची लक्ष्मीकांत त्रिवेदी याच्याशी ओळख झाली. त्यांनी त्यांच्या विकर्ष स्टॅम्पींग इंडिया या कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास वार्षिक ३० टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे त्यांनी ८१ लाख चेकद्वारे व २९ लाख ५० हजार रुपये रोख असे १ कोटी १० लाख ५० हजार रुपये सप्टेंबर व ऑक्टोंबर २०२० मध्ये गुंतविले. त्यानंतर त्रिवेदी याने गुंतवलेले पैसे व त्यावरील कोणताही परतावा न दिल्याने त्यांनी वारंवार फोन केले तरी ते टाळाटाळ करु लागले.

त्यांनी केलेल्या गुंतवणुकीची वचन चिठ्ठी लिहून दिली. फिर्यादी यांना कंपनीत टेक्नीकल डायरेक्टर म्हणून घेतले. त्यांची कंपनी फायद्यात चालू असल्याने त्रिवेदीकडे त्यांनी वारंवार पैसे परत मागितले. तेव्हा त्यांनी २ मे २०२२ रोजी ८१ लाख रुपयांचे चार धनादेश दिले. ते धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने परत आले. तेव्हा ते त्रिवेदी यांना भेटायला गेले असताना त्यांनी तुझी माझे व्यवसायात यायची लायकी नाही, असे म्हणून त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांची १ कोटी १० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here