पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने रेझिंग डे स्वेरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, गोपाळपूर पोलीस ठाणे कडील उपलब्ध शस्त्राची माहिती, पोलीस ठाणे कामकाज , महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे, सोशल मीडियाचा, सायबर गुन्हेगारी, व महिला विषयक कायद्याची माहिती दिली.
विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. तसेच प्रियदर्शनी फार्मसी कॉलेज, कासेगाव येथे भेट दिली. विद्यार्थ्यांना वरील प्रमाणे माहिती देण्यात आली. 2जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान मा. पोलीस अधीक्षक सो यांचे सूचनेप्रमाणे रेझिंग डे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.







