चौकशी करणाऱ्या शनिवार पेठ पोलिसांना शिवीगाळ; तरुणावर गुन्हा दाखल

maharashtra-police

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : पोलीस चौकीत गोंधळ घालून पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची घटना घडली. शनिवार पेठ पोलीस चौकीत हा प्रकार घडला असून, याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अथर्व रामचंद्र जोशी (वय २२, रा. विश्वकमल काॅम्प्लेक्स, नारायण पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस शिपाई प्रसाद ठाकूर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, नववर्षाच्या मध्यरात्री एकच्या सुमारास दुचाकीस्वार अथर्व भरधाव वेगात निघाला होता. त्यावेळी त्याने एका दुचाकीस्वार महिलेला धडक दिली. अपघातात महिलेच्या दुचाकीचे नुकसान झाले. नंतर महिलेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. बंदोबस्तावरील पोलिसांनी अथर्वला ताब्यात घेतले. त्याला शनिवार पेठ पोलीस चौकीत नेले. तेव्हा त्याने पोलीस चौकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

 

पोलीस चौकीत त्याने तक्रारदार महिलेसह पोलिसांना शिवीगाळ केली. पोलीस शिपाई ठाकूर आणि इनामदार यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी अथर्ववर गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here