सिडको भागातून दोन कट्ट्यांसह जीवंत काडतुसे हस्तगत : दोघे अटकेत

arrested-with-revolver
File photo

नाशिक (प्रतिनिधी कुबेर जाधव) : सिडकोतील कालिका पार्क भागात गावठी पिस्तूल बाळगणा-या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून दोन कट्यांसह जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विकास वसंत घोडे (३२ रा. घरकुल योजना चुंचाळे) व नवनाथ श्रीराम वाकडे (३४ रा.सावतानगर,सिडको) अशी अटक करण्यात आलेल्या पिस्तूलधारींची नावे आहेत. कालिका पार्क येथील ग्लोरी अपार्टमेंट मागील मनपसंद स्विट भागात फिरणा-या दोघांकडे पिस्तूल असल्याची माहिती अंबड पोलीसांना मिळाली होती.

 

त्यानुसार पथकाने धाव घेत दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात सुमारे ५० हजार रूपये किमतीचे दोन गावठी कट्टो जिवंत काडतुसे मिळून आले. याबाबत पोलीस नाईक राहूल जगझाप यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास उपनिरीक्षक नितीन फुलपगारे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here