जळगाव (क्राइम रिपोर्टर संजय विसपुते) : अंजनी ग्रुप दुय्यम विद्यामंदिर हिंगोने बुद्रुक या शाळेत ऐतिहासिक महामित्र मेळावा ४ जानेवारी २०२४ रोजी आयोजित केला आहे.या शाळेत१९६५ पासून ते २०२४ पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
शाळेतील सर्व आजी माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील यात सहभाग राहणार आहे.तसेच विविध खेळ व मनोरंजन देखील कार्यक्रमादरम्यान होणार आहेत. कार्यक्रमासाठी एरंडोल व धरणगाव येथील तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. तरी अंजनी ग्रुप दुय्यम विद्यामंदिर येथे शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.
कार्यक्रम सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालणार आहे. साधारण दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती राहील. कार्यक्रमासाठी आयोजकांनी उत्तम व्यवस्था केली आहे.







